छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) घाटीतील परिचारिकांनी पुकारलेल्या चौथ्या दिवशी शुक्रवारी सुरूच होता. सुमारे सहाशेहून अधिक परिचारिका संपावर आहेत, तर १८५ परिचारिका काळ्या फिती लावून कर्तव्यावर आहेत. काही वॉर्डात एक-कुठे दोन परिचारिका आहेत, तर काही परिचारिकांना एकाच वेळी दोन वॉर्डातील शंभर रुग्णांची जबाबदारी सांभाळत १२-१२ तास काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा म्हणून घाटी रुग्णालयातील परिचारिकांच्या संघटनेकडून काम बंद आंदोलन सुरू आहे. सलग चार दिवसांपासून सहाशेहून अधिक नर्सेस संपावर आहेत, मात्र दुसऱ्या संघटनेच्या नर्सेसकडून काळ्याफिती
लावून रुग्णसेवेचे कर्तव्य बजावण्यात येत आहे. त्यांच्या मदतीला शहरातील चार खासगी नर्सिंग महाविद्यालयाचे साडेतीनशे विद्यार्थी आणि घाटी नर्सिंग महाविद्यालयाचे अडीचशे असे सहाशेहून अधिक नसिंगचे विद्यार्थी रुग्णसेवेला मदत करत आहेत. मात्र दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ओपीडीत दाखल असलेल्या रुग्णांच्या मानाने यंत्रणेवर ताण पडत आहे.
काही वॉर्डात दोन तर काही वॉर्डात एक परिचारिका ड्यूटीवर आहे. काही परिचारिकांना एकाच वेळी दोन-दोन
वॉर्डातील रुग्णांकडे लक्ष द्यावे लागत असल्याने घाटी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी गुरुवारी रात्री विविध वॉर्डाना प्रत्यक्षभेट देत रुग्णांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना केल्या.
शुक्रवारी ८९ शस्त्रक्रिया
संपाच्या परिस्थितीत शुक्रवारी दिवसभरात मेजर २६ आणि मायनर ६३ अशा एकूण ८९ शस्त्रक्रिया पार पडल्या. तर दोन नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















